Ad will apear here
Next
पर्जन्ययाग रुद्र स्वाहाकाराची सांगता मुसळधार पावसाने
हिमायतनगरचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या संकल्पनेतून आयोजन

हिमायतनगर : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले, तरीही हिमायतनगर तालुक्यात पाऊस झाला नसल्यामुळे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रेरणेतून हदगाव-हिमायतनगर मतदारसंघात पर्जन्ययाग रुद्र स्वाहाकार महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याची सांगता २७ जुलैला मुसळधार पावसाने झाली. 

आमदार आष्टीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिर येथे ‘एक व्यक्ती एक झाड’ ही संकल्पना राबवत एक लाख वृक्षांचे वाटप करण्यात आले. या महायज्ञाच्या शेवटच्या दिवशी सर्व भाविकांच्या उपस्थितीत यज्ञास आहुती देण्यासाठी व होमहवनाच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केल्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.

शहरातील परमेश्वर मंदिर कमिटी व आमदार आष्टीकर यांच्या वतीने पर्जन्यमान रुद्र स्वाहाकार महायज्ञाचे आयोजन २१ ते २७ जुलै या कालावधीत केले होते. यात अनेक जोडप्यांनी आपली उपस्थिती दर्शवून महायज्ञ केला. सात दिवस सुरू असलेल्या या यज्ञात तालुक्यातील गावा-गावांतील नागरिकांनी सहभाग घेऊन वरुणराजाला साकडे घातले होते. २७ जुलैला याची सागंता झाली. आमदार आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्याचे वाटप व ‘एक व्यक्ती एक झाड’ संकल्पना राबविण्यात आली. आमदारांच्या वाढदिवसानिमित्त पोटा येथील कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेचे कॅलेंडर काढून त्याचे गावात वाटप केले. 


या वेळी जेष्ठ शिवसैनिक रामभाऊ राठोड, विठ्ठल ठाकरे, नगराध्यक्ष कुणाल राठोड, तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, तालुका संघटक संजय काईतवाड, तालुका उपप्रमुख विलास वानखेडे, शहराध्यक्ष प्रकाश रामदिनवार, राम पाटील, नागोराव पाटील देवसरकर, संतोष पाटील, राजू पाटील भोयर, गणप्रमुख अरविंद पाटील जाधव, युवा अध्यक्ष विशाल राठोड, योगेश चिल्कावार, विपुल दंडेवाड, सावन डाके, गजानन हरडपकर, गजानन पाळजकर, बळीराम देवकते, गजानन चायल, राम नरवाडे, अमोल धुमाळे, आमोल देवराये, देवानंद सूर्यवंशी, राजेश जाधव, विठ्ठल ठाकरे, हनुसिंग ठाकूर यांच्यासह असंख्य शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZGECC
Similar Posts
हिमायतनगर शहरात पर्जन्ययाग रुद्र स्वाहाकार हिमायतनगर : जुलै महिना संपत आला, तरी हिमायतनगरमध्ये पावसाचे आगमन झाले नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर येथे हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडून पर्जन्ययाग रुद्र स्वाहाकार महायज्ञाला सुरुवात करण्यात आली आहे.
हिमायतनगरमधील पाच शिवसैनिक अयोध्येला रवाना हिमायतनगर : शहरातील पाच शिवसैनिक २२ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी सात वाजता हिमायतनगर येथून अयोध्येला रवाना झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्या मंदिर बांधकामाच्या मागणीसाठी शिवसैनिक अयोध्येत जमणार आहेत. त्यासाठी हिमायतनगर शहरातील शिवसेनेचे प्रमुख नगरसेवक रामभाऊ ठाकरे,
हिमायतनगरमध्ये बारा कोटींच्या विकासकामांना सुरुवात हिमायतनगर : आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते शहरातील विविध भागांत बारा कोटींच्या वेगवेगळ्या विकासकामांना सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी आमदार पाटील यांनी येणाऱ्या दिवसांत शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन नागरिकांना दिले.
हिमायतनगरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश हिमायतनगर : हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे आमदार नागेश पाटील-आष्टीकर आणि नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील अनेक तरुणांनी आणि काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा कार्यक्रम नगरपंचायतीच्या प्रांगणात आठ जुलै २०१९ रोजी झाला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language